Photo Credit; instagram

2 वेळा घटस्फोट अन् दु:खात तर मुलीने... अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?

Photo Credit; instagram

रुखसार रहमान ही टेलिव्हिजन आणि बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Photo Credit; instagram

नुकतंच, तिने आपल्या घटस्फोटित आयुष्याबद्दल आणि तिच्या मुलीबद्दल सांगितलं. त्यावेळी गर्व या शब्दाचा वापर करणार नसल्याचं तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

आपल्या मुलीबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, "एवढं नक्की सांगेन की माझी मुलगी आयशा असल्यामुळे मी खूप आनंदी आणि देवाची आभारी आहे. खरंच, ती खूपच वेगळी मुलगी आहे."

Photo Credit; instagram

"जर माझी मुलगी माझ्यासोबत नसती तर माझं काय झालं असतं, मला नाही माहीत. घटस्फोट झाल्याच्या दु:खात असताना माझ्या मुलीनेच त्यातून बाहेर निघण्यास माझी मदत केली."

Photo Credit; instagram

रहमानने तिचा दुसरा पती फारुक कबीरपासून घटस्फोट झाल्याबद्दल सुद्धा बोलली. त्यावेळी ती म्हणाली की जीवनातील प्रत्येक बदल आपल्याला काही ना काही शिकवतो.

Photo Credit; instagram

ती म्हणाले, "चांगले-वाईट अनुभव तर येतच असतात. कधी तुम्ही अधिक समजुतदार होता तर कधी तुम्हाला हा अध्याय संपल्यासारखं जाणवतं. अशा वेळी, देवाचं नाव घेऊन पुढे जात राहिलं पाहिजे."

Photo Credit; instagram

कुटुंबियांच्या हट्टामुळे रुखसारने वयाच्या 19 व्या वर्षीच लग्न केलं होतं. त्यातून तिला आयशा ही मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तिला जीवनातील नवं ध्येय कळलं आणि ती घर सोडून निघून आली.

Photo Credit; instagram

2010 मध्ये तिने फारुकसोबत लग्न करुन नव्या आयुष्याची सुरुवात केली पण, 13 वर्षांनंतर तिचं दुसरं लग्न देखील मोडलं. मात्र, हे सगळं दु:ख विसरुन ती तिच्या मुलीसोबत आनंदी जीवन जगत आहे.

पुढील वेब स्टोरी

नेहाने एवढे हॉट फोटो केले शेअर की जणू इंटरनेटचा सर्व्हरच जाम!

इथे क्लिक करा