Photo Credit मुंबई Tak

Arrow

मुंबई Tak बैठक:  क्रिकेटर ऋतुराज गायकवाडच्या प्रश्नावर अभिनेत्री सायली संजीवचं थेट उत्तर...

Arrow

मुंबई Tak बैठकीत राजकारण्यांपासून ते मराठी सिनेसृष्टीतील कलाकारापर्यंत अनेकांनी हजेरी लावली.

Arrow

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सायली संजीव या दोघी एकाच मंचावर दिसल्या.

Arrow

यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत करिअरच्या सुरूवातीला केलेल्या संघर्षाची कहाणी सांगितली.

Arrow

सोनालीने हिरकणी चित्रपटावरून स्त्रीप्रधान मुद्दा मांडला.

Arrow

सोनालीला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, 'सिनेसृष्टीत स्त्रीप्रधान चित्रपटांना तितकं महत्त्व दिलं जातं का?'

Arrow

यावर सोनाली म्हणाली, 'पूर्वीपेक्षा चित्रपटांची स्थिती बदललेली आहे. आता या चित्रपटांना महत्त्व मिळतं. त्यासाठी तितका खर्चही केला जातो आणि ते बॉक्स ऑफिसवरही गाजतात.'

Arrow

सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कसे सामोरे जाता यावर सोनाली म्हणाली, 'ट्रोलिंग म्हणजे आपल्या बिल्डींगमधल्या काकू आणि मावश्या आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं.'

Arrow

'सोशल मीडियाला नेगेटिव्हली घेऊ शकत नाही कारण, आपल्या चित्रपटांचं प्रोमोशन हे अर्ध्याहून अधिक त्यामुळेच होते.'

Arrow

तर सायली संजीवला तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे तिला सरळ ऋतुराज गायकवाडवरून प्रश्न विचारला गेला.

Arrow

यावर तिनेही स्पष्ट सांगितलं. ती म्हणाली, 'सगळ्यांना माहितीय, आम्ही मित्र आहोत, तरी परत पुन्हा एकदा सांगते आम्ही मित्रच आहोत.'

Arrow

'पण सततच्या ट्रोलिंगमुळे आता ही मैत्री देखील राहिली नाही अशी खंत सायलीने व्यक्त केली.

चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यानंतर CM शिंदेंनी फोन करून काय सुनावलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा