आलिया भट्टला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तो हा प्रसंग आणखी खास बनवला आहे तो तिचा पती रणबीर कपूरने. त्या क्षणाचा रणबीरने एक व्हिडिओ बनवला आहे.
दिल्लीत झालेल्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया स्टायलिश स्टाईलमध्ये पोहोचली होती. तिला सपोर्ट करण्यासाठी तिचा पती रणबीरही तिथे पोहचला होता.
समारंभात आलियाला तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आलिया भट्ट तिचा राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी मंचावर पोहोचली तेव्हा तिचा पती रणबीर कपूर त्याचा फोन घेऊन तिचा व्हिडिओ बनवत होता.
पत्नीच्या या मोठ्या यशाने रणबीर प्रचंड आनंदी होतान दिसला. आलियाच्या चेहऱ्यावरही तो आनंद लपून राहिला नाही.
या भव्य सोहळ्यात आलिया भट्ट तिच्या लग्नाची साडीवर सहभागी झाली होती.
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बनवला होता.
सनी देओलकडे जाताय तर मार खायची ठेवा, दिग्दर्शकाला दिला होता इशारा