अनन्या पांडे आणि तिचा बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर यांच्यातील नातं आता कोणापासूनच लपून राहिलेले नाही. कॉफी विथ करणमध्ये अनन्याने आदित्यसोबतच्या नात्याला उघडपणे कबुली दिली आहे.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात अनन्याने न बोलताच काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर सारा अली खाननेही त्यांच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. या कार्यक्रमात करणने अनन्याला आदित्यशी संबंधितच काही सवाल केले होते.
एका सेगमेंटमध्ये करण जोहरने सांगितले की, आदित्यसोबत लग्न केल्यानंतर अनन्याचे आडनाव CRAP असेल का त्यावर ती म्हणाली की, CRAP नाही तर आमचे आडनाव हे PARK(अनन्या पांडे आदित्य रॉय कपूर) असेल असंही तिने सांगितले.
करण जोहरने हे तिचे गणित सांगितल्यानंतर मात्र अनन्या म्हणाली की, माझ नाव आणि आडनावाचं सगळं गणित मी आधीच केलं आहे.
करण जोहरच्या कार्यक्रमात सारा आणि करणने या दोघांनीही तिला चिडवण्याची एकही संधी सोडली नाही.
कॉफी विथ करणमध्ये झालेल्या रॅपिड राउंड मध्ये तिच्या अनेक सकारात्मक बाजूही दिसून आल्या.
यावेळी तिने हेही सांगितले की, 'लाइफ इन अ मेट्रो' या चित्रपटात ही दोघंही एकत्र काम करत आहेत
करणच्या कार्यक्रमात अनेक गोष्टी अनन्याने सांगितल्या असल्या तरी त्या दोघांचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या दोघांची असलेली केमिस्ट्री आता लोकांनाही आवडू लागले.