Photo Credit; instagram

Arrow

कॅन्सरशी दिला लढा, 2 वर्षांचं मोडलं लग्न, मनीषासोबत काय काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

मनीषा कोईराला ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी एक अभिनेत्री आहे, जिने एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले होते.

Photo Credit; instagram

Arrow

पण खऱ्या आयुष्यात तिचे जीवन अडचणींनी भरलेले होते. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मनीषा कोईराला आज 16 ऑगस्ट ५३ वा वाढदिवस साजरा करतेय.

Photo Credit; instagram

Arrow

वाढदिवसानिमित्त मनीषाच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. 1970 साली तिचा जन्म काठमांडू, नेपाळ येथे झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

'फेरी भेतौला' या नेपाळी चित्रपटातूनही मनीषाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ती हिंदी चित्रपटांकडे वळली आणि सौदागर चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

मनीषाच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर 1942: एक प्रेम कथा, अकेले हम अकेले तुम सारख्या चित्रपटात काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

मनीषा नाना पाटेकरसोबत 'अग्नी साक्षी'मध्येही दिसली होती. शुटिंगदरम्यान तिचं आणि नाना पाटेकर यांचं रिलेशन असल्याची चर्चा होती. 

Photo Credit; instagram

Arrow

नाना पाटेकर यांच्याशिवाय मनीषाचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले. पण 2010 मध्ये तिने काठमांडू येथील नेपाळी व्यावसायिक सम्राट दहलशी लग्न केले, जो तिच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान होता.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार मनीषा सम्राटला फेसबुकवर भेटली. नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न केलं. पण लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच दोघांमधील दूरावा वाढला.

Photo Credit; instagram

Arrow

तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती की तिला पतीपासून घटस्फोट हवा आहे. नंतर २०१२ मध्ये घटस्फोट घेऊन दोघांचे मार्ग वेगळे झाले. तिचे वैवाहिक जीवन खूप कठीण होते.

Photo Credit; instagram

Arrow

एकीकडे लग्न मोडल्याचे दु:ख आणि दुसरीकडे मनीषाला कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले. 

Photo Credit; instagram

Arrow

तिने कॅन्सरशी दीर्घकाळ लढा दिला, त्यानंतर 2015 मध्ये तिने कॅन्सरशी लढाई जिंकली. एकूणच, मनीषाच्या जीवनात अडचणी काही कमी नव्हत्या. 

केस दुपटीने वाढतील, थांबेल हेअर फॉल; ट्राय करा 'ही' योगासनं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा