Arrow

सेलिब्रिटींच्या घरातील वादही आले होते चव्हाट्यावर...

Arrow

बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींच्या घरातील वाद हे अनेकदा त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. चित्रपटसृष्टीतही अशा अनेक हाणामाऱ्या झाल्या आहेत, त्या खूप चर्चेत राहिल्या आहेत.

Arrow

अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस झाला. त्यावेळी ऐश्वर्या राय बच्चनची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत राहिली होती. कारण त्यांच्या कुटुंबातील फोटोमधून श्वेता, जया, नव्या आणि अगस्त्याला क्रॉप करून त्यांनी अमिताभ आणि आराध्याचा तेवढा फोटो पोस्ट केला होता.

Arrow

बच्चन कुटुंबाचीही नंतरही खूप चर्चा झाली जेव्हा श्वेता नंदानेही तिच्या इंस्टाग्रामवर  कुटुंबाचा फोटो शेअर केला, पण त्यात ऐश्वर्याला टॅग केले नाही.

Arrow

कपूर कुटुंबात बबिताने संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात जाऊन आपल्या दोन मुली करिश्मा आणि करिना यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची परवानगी दिली होती, त्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंबाबरोबर वाद झाले होते. 

Arrow

अभिनेता रणबीर कपूरने एकदा खुलासाही केला होता की, वडील ऋषी कपूर यांच्याबरोबर त्याचे बालपणात नाते चांगले नव्हते आणि अनेकदा त्या दोघांमध्ये वादही झाली होती.

Arrow

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने 2019 मध्ये सांगितले होते की, तिचे एका मुस्लिम मुलावर प्रेम होते, जेव्हा तिच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा तिचे वडील राकेश रोशन यांनी तिच्या कानशिलात लगावली होती, आणि त्यांचे ते नाते त्यांनी स्वीकारले नव्हते.

Arrow

काजोल आणि राणी मुखर्जी खऱ्या आयुष्यात चुलत बहिणी आहेत, पण हे फार कमीवेळा दिसते. या दोघीही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकमेकींना टाळत असतात, मात्र याचे कारण काही समजले नाही.

Arrow

चित्रपट निर्माते अनुराग आणि अभिनव कश्यप यांच्यातही चांगले संबंध नाही. दबंग 2 दरम्यान दोघांमध्ये मतभेद झाले होते.

Arrow

चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचे हृदय आणि उदय या भावांसोबतही त्यांचे चांगले संबंध नाहीत. 

Arrow

गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वादही सर्वपरिचित आहे. एकदा कॉमेडियन कृष्णाने गोविंदाची खिल्ली उडवली होती, त्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. कृष्णाने गोविंदाची माफी मागण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला.

Arrow

जेव्हा संजय दत्तने मान्यतासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याच्या दोन्ही बहिणी प्रिया आणि नम्रताने त्याला विरोध केला होता. त्यानंतर त्या भावंडांचा वाद होऊन त्यांनी दोन्ही बहिणींनाही आपल्या लग्नात बोलावले नव्हते.

‘भाभीजी घर बैठा करो…’, ‘या’ क्रिकेटरची भारतीय पत्नी का झाली ट्रोल?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा