Photo Credit: instagram

फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा

VIDEO Credit: instagram

राजेश्वरीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2013 मध्ये नॅशनल अवॉर्ड विजेत्या मराठी चित्रपट फँड्री (Fandry) मधून केली. त्यावेळी ती फक्त नववीत शिकत होती.

Photo Credit: instagram

फँड्री चित्रपटात तिने 'शालू' ही व्यक्तिरेखा साकारलेली. या चित्रपटात तिच्याकडे एकही संवाद नव्हता, तरीही तिच्या अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधले.

Photo Credit: instagram

फँड्रीच्या चित्रीकरणादरम्यान ती केवळ 15 वर्षांची होती. चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने तिला शाळेतून निवडलेलं आणि पालकांची परवानगी घेऊन तिला सिनेमात संधी दिलेली.

Photo Credit: instagram

यानंतर राजेश्वरीने पुणे ते गोवा आणि आयटमगिरी (2017) या मराठी चित्रपटांमध्येही काम केलेलं. ज्यामुळे तिची लोकप्रियता वाढली.

Photo Credit: instagram

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर सक्रिय असून, ती तिच्या पोस्ट्स आणि फोटोंद्वारे फॉलोअर्सशी जोडलेली असते. 

Photo Credit: instagram

राजेश्वरी हिने आपल्या अभिनयाबरोबरच शिक्षण पूर्ण करण्यावरही भर दिला आहे. पण आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी ती फारशी कुठेही भाष्य करताना दिसून येत नाही.

Photo Credit: instagram

राजेश्वरी खरातला भविष्यात आणखी चांगली कामं अपेक्षित आहे. तिच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर येतात. पण ती सध्या चांगल्या पटकथेची वाट पाहत आहे.

Photo Credit: instagram

राजेश्वरी ही तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियामध्ये मात्र नेहमीच चर्चेचा विषय असते.

पुढील वेब स्टोरी

Amruta Fadnavis: मिसेस मुख्यमंत्री 'यामुळे' आहेत खूप फिट, योगाची प्रचंड आवड

इथे क्लिक करा