जिग्नाच्या 'त्या' कृतीवर ऐश्वर्या म्हणाली "मी माझ्या नवऱ्याचेही कपडे..."
बिग बॉस 17 मध्ये आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्येच आता विभागणी झाली आहे. त्यामुळे त्यांचे नातेसंबंधही दुरावत आहेत.त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यही आता उघडपणे एकमेकांवर राग काढताना दिसत आहेत.
आता यावेळी अरुणने जिग्ना व्होराला घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले. अरुणच्या या कृतीमुळे जिग्नाला मात्र त्याचे वाईट वाटले आहे.
रात्रीच्या वेळी जिग्ना या कार्यक्रमामध्ये तिचे दोस्त रिंकू धवन, मन्नारा आणि ऐश्वर्याबरोबर नॉमिनेशन टास्कवर ती चर्चा करताना दिसली आहे.
यावेळी ऐश्वर्या रागाने तिला म्हणाली की, जिग्नाने अरुणचे अंडरवेअरही धुतले आहेत, तरीही त्याने जिग्नाला नॉमिनेट केले असल्याचा टोमणा मारला आहे.
ऐश्वर्याच्या या गोष्टीवर मन्नारा म्हणते की, अरे यार असं काही बोलू नको, त्यावर ऐश्वर्या आणि जिग्ना ओरडून म्हणतात की, का बोलायचं नाही, तिला लाज वाटल पाहिजे.
त्याही पुढे ऐश्वर्या म्हणते की, अरुणने जिग्नाकडून आपले सगळे कपडे धूऊन घेतले आहेत. अगदी आपले अंडरवेअरही. त्यामुळे त्यांनाच त्याची लाज वाटली पाहिजे असंही ती त्यांना म्हणाली आहे.
हे सगळं घडून गेल्यानंतर ऐश्वर्या पुन्हा जिग्नाला हे तू अरुणलाही सांग असं ती म्हणते. तर जिग्ना मात्र अरुणशी याबाबत बोलण्यास नकार देते.
बिग बॉसच्या स्पर्धकांमधील संबंध आता बदलत्या हवामानाप्रमाणे झाले आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बेदखल होणार याचीच सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
Sara Tendulkar प्रचंड चिडली, कोणावर आणि का एवढी रागावली?