Madhuri Dixit : 'मी ते करायला नको होतं' त्या एका सीननंतर माधुरीला का वाटली लाज?
Photo Credit; instagram
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने अनेक चित्रपटांमध्ये काम करून मोठं नाव कमावलं. पण इंटिमेट आणि किसिंग सीनपासून ती दूरच राहिली.
Photo Credit; instagram
दयावान या चित्रपटात माधुरीने विनोद खन्नासोबत एक किसिंग सीन दिला होता. ज्याची खूप चर्चा झाली. ती इतकी बोल्ड असल्याचे पाहून चाहत्यांना धक्काच बसला.
Photo Credit; instagram
यावेळीही माधुरीने या सीनसाठी काही वेळाने संमती दिली होती, मात्र नंतर तिला खूप लाज वाटली.
Photo Credit; instagram
मुलाखतीत याबाबत बोलताना माधुरीने 'मी हा किसिंग सीन का केला याची खंत व्यक्त केली. त्यावेळी तिने यासाठी नाही म्हणायला हवं होतं.'
Photo Credit; instagram
माधुरी म्हणाली, 'मी जेव्हाही मागे वळून पाहते तेव्हा मला वाटते की मी या सीनसाठी नकार द्यायला हवा होता. पण नंतर एक अभिनेत्री असल्याने मी दडपणाखाली आले.'
Photo Credit; instagram
'दिग्दर्शकही सीन शूट करायला तयार होता. पण मला वाटलं मी हे केलं नाही तर स्टोरी बिघडेल. पण तसं नव्हतं. चित्रपटातील हा एक गरज नसलेला सीन होता.'
Photo Credit; instagram
माधुरी पुढे म्हणाली, 'मी कोणत्याही फिल्मी बॅकग्राउंडमधून आलेली नाही. मला याचे नियम माहित नव्हते. मला माहित नव्हते की तुम्ही नाही पण म्हणू शकता. यामुळे मी ते केलं.'
Photo Credit; instagram
'पण नंतर जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा मला खूप लाज वाटली की मी तो का केला. तेव्हापासून मी ठरवले की मी यापुढे कोणतेही किसिंग सीन करणार नाही.'
Photo Credit; instagram
माधुरी आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा दयावान हा चित्रपट 1988 मध्ये आला होता. त्याचे दिग्दर्शन फिरोज खान यांनी केले होते.
Bhumi pendnekar दिवसाची सुरूवात करते खास, 'या' एका गोष्टीशिवाय नाही राहू शकत