अनंत अंबानींचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन जामनगरमध्येच का? नीता अंबानींनी सांगितलं कारण...
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन आजपासून सुरू झाले आहे. आता नीता अंबानींनी सेलिब्रेशनची खास झलक दाखवत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
यामध्ये त्या कला आणि संस्कृतीबद्दलच्या प्रेमाबद्दल आणि मुलगा अनंतच्या लग्नासाठी जामनगर का निवडलं याचं कारण सांगताना दिसतायेत.
Photo Credit; instagram
नीता अंबानी या व्हिडीओमध्ये सांगत आहेत की, 'त्यांच्यावर कला आणि संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. याचा त्यांच्या मनावरही खोल परिणाम झाला आहे.'
Photo Credit; instagram
नीता अंबानींना त्यांचा धाकटा मुलगा अनंत याच्या लग्नात आपली संस्कृती साजरी करायची होती. जामनगर त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.
Photo Credit; instagram
नीता म्हणाल्या, 'त्यांचे कटुंब मूळचे गुजरातचे आहे. इथेच मुकेश अंबानी आणि त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी रिफायनरी उघडली आणि मी ही करिअरला सुरुवात केली.
Photo Credit; instagram
नीता सांगतात की, 'या ओसाड परिसराला आनंदी आणि हिरवंगारशहर बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना मुलाच्या लग्नात कला आणि संस्कृती साजरी करायची आहे.'
Photo Credit; instagram
व्हिडीओच्या शेवटी नीता अंबानी म्हणाल्या की, 'संस्कृती आणि परंपरा हा भारताचा पाया आहे. जामनगर हे अंबानी कुटुंबीयांच्या हृदयात खोलवर रुजले आहे.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss साठी मिळेल प्रेरणा, फक्त पाहा 'हे' 6 चित्रपट!