अखेर ठरलंच... परिणीती-राघवच्या लग्नाची फुटली सुपारी!
अभिनेत्री परिणीती चोप्राचे लव्ह लाईफ सध्या चर्चेत आहे. आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबतच्या तिचं लग्न होणार आहे असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. परिणीती आणि राघव ऑक्टोबरमध्ये लग्न करू शकतात.
परिणीती-राघवच्या लग्नाची सुपारी फुटली (रोका) आहे असे म्हटले जात आहे.
या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस ते लग्न करू शकतात. लग्नासाठी परिणीती-राघवला अद्याप घाई नाहीये.
दोघांच्याही कामाबद्दल कमिटमेंट्स आहेत. लग्नापूर्वी त्यांना त्यांचे प्रोफेशनल प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे आहेत.
परिणीतीच्या लग्नाची तारीख अशा प्रकारे घेण्यात येईल की, जेणेकरून तिची चुलत बहीण प्रियांका चोप्राही लग्नाला येऊ शकेल.
गंमत म्हणजे Jio MAMI फेस्टिव्हल ऑक्टोबरमध्ये होणार आहे. प्रियांका त्याची अध्यक्षा आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती भारतात येणार असल्याची चर्चा आहे.
हा फेस्टिव्हल 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. यादरम्यान, परिणीतीच्या लग्नाची तारीख निश्चित होऊ शकते.
प्रियांका तिच्या शो सिटाडेलच्या प्रमोशनसाठी नुकतीच भारतात आली होती. यावेळी राघव-परिणितीने तिची भेट घेतली होती.
आजकाल परिणीती फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी खूप स्पॉट होत आहे. त्यावरून तिच्या लग्नाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
प्रियांका चोप्राला प्रचंड आवडातात आंबे, पाहा खास फोटो!