प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. ती MAMI फिल्म फेस्टिव्हलमधील एक महत्वाची पाहुणी असणार आहे. त्यामुळे यावेळचा तिचा करवा चौथ आपल्या पतीसोबत ती साजरा करु शकणार नाही. त्यामुळे करवा चौथ ती मिस करणार आहे.
बॉलिवूड लाईफनुसार, प्रियांका आणखी काही दिवस भारतातच थांबणार आहे. ती सध्या MAMI फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार असल्यामुळे ती त्यामध्ये व्यस्त आहे.
तिच्या व्यस्त कार्यक्रमामुळे तिचा यंदाचा करवा चौथ आपल्या नवऱ्याबरोबर ती लॉस एंजेलिसमध्ये करु शकणार नाही.
प्रियांका सध्या लॉस एंजेलिसला जाणार नाही मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती परदेशात परतणार आहे.
प्रियांकाने दिग्दर्शक विशाल भारद्वाजसोबत एक चित्रपट साईन केला आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाबद्दल त्यांच्या बैठका सुरु आहेत. त्या तिला लवकर संपवून परतावे लागणार आहे.
प्रियांकावर सध्या तिच्या मुलीची जबाबदारी आहे. त्यामुळे ती भारतातील लवकर कामं संपवून ती परतण्याच्या तयारीत आहेत.
प्रियांका यावेळी पती निकसोबत करवा चौथ करणार नाही. मात्र यावेळी त्याच्यासाठी ती नक्कीच उपवास करणार आहे. कारण ती तेवढीच संस्कृतीप्रिय अशी अभिनेत्री आहे.
प्रियांकाला देसी गर्ल म्हटले जाते ते यामुळेच. यावर्षी प्रियांका आणि निकच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण होणार असून ती दोघंही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.
प्रियांकाने 'जी ले जरा' हा चित्रपट सोडल्याचे वृत्त आहे. मात्र अजून तरी त्याबाबत खरं काही सांगण्यात येत नाही.
सलमान खानच्या खांद्यावर हात ठेवलेली ‘ती’ व्यक्ती कोण?