सलमान खानच्या खांद्यावर हात ठेवलेली 'ती' व्यक्ती कोण?
सलमान खान सध्या सौदी अरेबियामध्ये आहे. सलमान तिथं बॉक्सिंगच्या सामन्याचा आनंद घेत आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबतचे त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यातच आता सलमानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात आहे. त्यामुळे या फोटोची चर्चा सुरु आहे.
यावेळी त्यांनी अरबस्तानच्या शाही दरबारातील मंत्री तुर्की अलाल शीख यांची भेट घेतली आहे. त्याचे फोटो त्याने आपल्या इंस्टा अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
त्या फोटोमध्ये मंत्री तुर्की अल शेख सलमानच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याबरोबर संवाद साधत आहेत.
सलमान खानने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, सौदी अरेबियातील रियाधमध्ये मला माझ्या भावासारखा असलेला तुर्की अलाल शीखसोबत मी माझा वेळ सध्या आनंदात घालवत आहे.
त्या फोटोबरोबरच सलमान खानने लिहिले की, मी सध्या बॉक्सिंग मॅचचा अनुभव घेत आहे. त्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो असंही त्यांने म्हटले आहे.
सलमान खानबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे, तो जेव्हा आनंदी असतो त्यावेळी तो आपण केलेल पेंटिग भेट देत असतो.
यावेळीही सलमानने तेच केले आहे त्याने आभार मानत एक पेंटिंग त्या मंत्र्यांना भेट दिले आहे.
सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. त्यामुळे एका युजर्सनी कमेंट दिली आहे की, हा आहे भाई का जलवा
सलमान खानचा टायगर 3 लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसून येणार आहे.