टीव्हीवरील 'कृष्णा'च्या घरात महाभारत, थेट IAS पत्नीविरोधात...
Photo Credit; instagram
महाभारत या टीव्ही मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांनी त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी IAS स्मिता भारद्वाज विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Photo Credit; instagram
नितीश भारद्वाज यांनी तक्रारीत म्हटले आहे की, स्मिता भारद्वाज अनेक दिवसांपासून त्यांचा मानसिक छळ करत होती.
Photo Credit; instagram
नितीश भारद्वाज यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांना मेल लिहून मदत मागितली आहे.
Photo Credit; instagram
'स्मिता भारद्वाज या मानसिक छळ करत असून त्यांच्या जुळ्या मुलींनाही भेटू देत नाही.' असंही त्यांनी म्हटलं आहे.
Photo Credit; instagram
नितीश भारद्वाज यांच्या तक्रारीवरून भोपाळ पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Photo Credit; instagram
अतिरिक्त डीसीपी शालिनी दीक्षित यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
नितीश भारद्वाज यांनी 'महाभारत'मध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
Photo Credit; instagram
त्यांचे श्रीकृष्ण हे पात्र लोकांच्या कायम स्मरणात राहिलं आहे. या भूमिकेमुळे त्याला इंडस्ट्रीत ओळख मिळाली.
Photo Credit; instagram
नितीश भारद्वाज यांनी 14 मार्च 2009 रोजी मध्य प्रदेश केडरच्या IAS अधिकारी स्मिता यांच्याशी दुसरे लग्न केले होते.