एखाद्या व्यक्तीचे रक्त त्याच्या शरीराबद्दल अनेक गोष्टी सांगते. त्यामुळे संशोधनातून अनेक गोष्टीही समोर आल्या आहेत.
A, B, AB आणि 0 रक्तगटांच्या रक्त पेशींच्या पृष्ठभागावर काही विशेष गोष्टी जोडलेल्या असतात.
A आणि B रक्तपेशींच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारचे ऍन्टीबॉडीज असतात, तर दोन्ही प्रकारचे ऍन्टीबॉडीज AB रक्तगटात आढळत असतात.
तज्ज्ञांच्या मते, रक्त आणि पेशींच्या पृष्ठभागावर अँटीबॉडी हा चिकट पदार्थ असतो. तो शरीराला बाहेरून येणाऱ्या विषाणू, बॅक्टेरियापासून संरक्षण देत असतो.
ए, बी आणि एबी रक्तगटांना हृदयाबाबत अनेक आजारांचा धोका असतो.
एका संशोधनात असं दिसून आले आहे की, A आणि B रक्तगट असलेल्या लोकांच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्याची 51 टक्के शक्यता असते. त्यामुळे हा धोका असतो.
O रक्तगट असणाऱ्यांना हृदयविकाराच्या अधिक धोका असतो. रक्तातील व्हॉन विलेब्रँड घटकाची पातळी, कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची वाढलेली शक्यता यामुळे हा धोका सांगितला जातो.