Photo Credit; instagram

दररोज प्या 'हा' पिवळा चहा; आरोग्यासाठी ठरेल चमत्कारी!

Photo Credit; instagram

जवळपास प्रत्येक भारतीच्या स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी ओव्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ओव्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत.

Photo Credit; instagram

आयुर्वेदात आरोग्यासाठी ओव्याच्या फायद्यांबद्दल सांगितलं गेलं आहे. ओवा पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. ओव्यामध्ये बरेच अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.

Photo Credit; instagram

ओवा कच्चा खाल्ल्याने किंवा त्याचा चहा करुन प्यायल्याने बरेच फायदे मिळतात. रोज सकाळी ओव्याचा चहा प्यायल्याने आरोग्य सुधारते.

Photo Credit; instagram

मुळव्याधाच्या समस्येसाठी ओवा अधिक गुणकारी मानला गेला आहे. ओव्याचा चहा प्यायल्याने या आजारापासून आराम मिळवता येऊ शकतो.

Photo Credit; instagram

ओवा वात आणि कफ नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी दररोज सकाळी ओव्याचा चहा पिणं फायद्याचं ठरेल.

Photo Credit; instagram

ओव्याचा चहा प्यायल्याने मेटाबॉलिजम बूस्ट होतं. त्यामुळे नियमित हा चहा प्यायल्याने वजन कमी करता येऊ शकतं.

Photo Credit; instagram

बऱ्याच रिसर्चनुसार, ओव्याच्या चहाचं सेवन केल्याने इन्सूलिनची सेन्सिटिव्हिटी सुधारते. यामुळे ब्लड शूगरची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते.

Photo Credit; instagram

ओव्याचा चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात ओवा टाकून ते 5 ते 7 मिनिटे उकळत ठेवा. त्यानंतर हे पाणी गाळून त्यात मध टाकून त्याचं सेवन करा.

पुढील वेब स्टोरी

पाहा किती ग्लॅमरस राहायची डोंबिवलीची क्रू मेंबर रोशनी, एका क्षणात...

इथे क्लिक करा