Arrow

मीठ किती प्रमाणात खावे, जाणून घ्या...

Arrow

मानवी शरीरासाठी मीठ हे खूप महत्वाचे आहे. त्याचे अनेक फायदे असले तरी ते सेवन करताना काही नियम हे पाळावेच लागतात.

Arrow

त्यात सोडियमही असते ते शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत करते आणि अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठीदेखील मदत करते.

Arrow

कोणत्याही व्यक्तीने दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये, परंतु संशोधनानुसार, लोक दररोज 10.8 ग्रॅम मीठ खात असतात.

Arrow

मीठ जास्त खाल्ल्याने शरीरामध्ये त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात. हृदयविकाराचा झटका, किडनी, पक्षाघात, उच्च रक्तदाब यासारख्या रोगांचाही धोका असू शकतो.

Arrow

जर तुम्हाला तुमच्या आहारातील सोडियमचे प्रमाण कमी करायचे असेल तर मिठाचा वापर मर्यादित करायला हवा.

Arrow

घरच्या जेवणाच्या तुलनेत, बाहेरच्या पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये भरपूर मीठ असते, ज्यामुळे लोक जाणूनबुजून किंवा नकळत जास्त सोडियमचे सेवन करतात.

Arrow

जर तुम्हाला तुमच्या आहारातील मीठ कमी करायचे असेल तर पॅकेज केलेले, खाण्यावर मर्यादा आणा. 

Arrow

घरी स्वयंपाक करताना मिठाचा वापर कमी करा.

Arrow

अनेकांना कडक मीठ खाण्याची आणि जेवणावर मीठ टाकण्याची सवय असते, मात्र ही सवय घातक आहे

Arrow

कोशिंबीर, रायता, दही यामध्ये मीठ कधीच वापरू नका.

‘हे’ एकच फळ तुम्हाला देईल हजार फायदे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा