Photo Credit; instagram

तुम्हीसुद्धा दररोज खाता जवसाच्या बिया? मात्र, 'या' लोकांसाठी ठरू शकतं घातक

Photo Credit; instagram

जवसाच्या बिया आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. याचे शरीरासाठी बरेच फायदे असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

जवसाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे असले तरी यांचे काही साइडइफेक्ट्स असतात.

Photo Credit; instagram

जवसाच्या बिया व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरसारख्या बऱ्याच पोषक तत्त्वांचे उत्तम स्त्रोत मानल्या जातात.

Photo Credit; instagram

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. हे पचनसंस्था सुरळीत करण्यासोबत वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

मात्र जवसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे अचानक त्यांचं अधिक सेवन केल्यानं पोट बिघडू शकतं. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि सूज अशा समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

जवसाच्या बिया आणि त्याच्या तेलामध्ये एलर्जी होण्याची शक्यता जास्त असते.

Photo Credit; instagram

या बिया खाल्ल्यानंतर शरीरात खाज, सूज, लालसरपणा किंवा पित्ताच्या गाठी दिसल्या तर ताबडतोब या बिया खाणे थांबवावे. उलट्या आणि मळमळ होणे हे देखील ऍलर्जीचे लक्षण असू शकतात.

Photo Credit; instagram

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात जे जळजळ कमी करतात, परंतु जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते शरीरात जळजळ वाढवू शकते.

Photo Credit; instagram

कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा समस्या टाळण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जवसाचे सेवन करावे. तसेच, त्याचे प्रमाण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलांकाच्या व्यक्तींनी पर्समध्ये ठेवा 'ही' वस्तू; पैशांची भरभराट अन् यश...

इथे क्लिक करा