Arrow

मधुमेहाला सायलंट किलर म्हणतात कारण...

Arrow

मधुमेह हा आजार अतिशय धोकादायक आहे. कारण तो मानवी शरीराला हळूहळू पोखरत जातो. म्हणूनच त्याला सायलेंट किलर असंही म्हणतात.

Arrow

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आणली नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारातच घेऊन जातो.

Arrow

WHO च्या मते 2019 मध्ये मधुमेह हे मृत्यूचे 9 वे प्रमुख कारण सांगितले गेले. त्यामुळे त्याची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

Arrow

तज्ज्ञांचे मतानुसार मधुमेहाची दोन लक्षणे तोंडाच्या आतही दिसतात. मात्र ही लक्षणं सहज लक्षात येत नाहीत.

Arrow

तज्ज्ञांच्या मते कोरडे तोंड म्हणजेच तोंडात कोरडेपणा जाणवणे हे मधुमेहाचे एक छुपे लक्षण आहे.

Arrow

तोंडातून गोड किंवा फळासारखा गंध येणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे. ही लक्षणे उच्च रक्तदाब किंवा हायपोग्लायसेमियाशी संबंधित असू शकतात. 

Arrow

जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, अंधुक दिसणे, वजन कमी होणे, तोंडावर व्रण येणे आणि जखमा भरण्यास उशीर होणे ही लक्षणंदेखील मधुमेहाचीच आहेत. 

Arrow

मधुमेह टाळण्यासाठी साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे निरोगी आहाराचे पालन करा, वजनावर नियंत्रण ठेवा आणि पुरेशी झोपही घ्या. आणि महत्वाचे म्हणजे तणाव टाळा.

‘या’ एका ड्रायफ्रूटचे होतील द्विगुणीत फायदे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा