Arrow

...तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार 

Arrow

तुमच्या पोटाला शरीराचा दुसरा मेंदू म्हटले जाते. आपल्या पोटात अनेक प्रकारचे जीवाणू आढळत असतात. त्याचा परिणाम पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्यावर होत असतो.

Arrow

आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही समस्यांबद्दल सांगणार आहोत. कारण या समस्या असतील तर तुम्ही समजून जा की, तुमचे पोट अजिबात निरोगी आहे.

Arrow

आम्ही तुम्हाला काही अगदी साधी लक्षणं सांगणार आहोत, ती लक्षणं तुमचे पोट किती कमकुवत आहेत तेच सांगणार आहेत.

Arrow

पचनाची समस्या असेल तर तुमचे पोट खूपच कमकुवत आहे. अतिसार, सूज येणे, गॅस याचा त्रास असू शकतो.

Arrow

काही गोष्टी खाल्ल्यानंतर पोट फुगणे, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत असेल तर ते कमकुवत पोटाचे लक्षण आहे.

Arrow

पुरेशी झोप मिळत असूनही, थकल्यासारखे वाटत असेल ते बर्‍याचदा पोटाची समस्या असल्याचेच चिन्हं दिसते. त्यामुळे तुमचे पोट अनेक प्रकारचे पोषक द्रव्ये शोषून ऊर्जा निर्माण करते. पण पोट अस्वस्थ असतानाही ते काम नीट करत नसल्यामुळेच तुम्हाला थकवा जाणवत असतो.

Arrow

आपला मेंदू आणि पोट एकमेकांशी जोडलेले आहेत. सेरोटोनिन हार्मोन आपल्या पोटातून बाहेर पडत असतो जो चांगला मूड राखण्यास आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असतो. पोट निरोगी नसल्यास, हा हार्मोन योग्यरित्या सोडला जात नाही, ज्यामुळे एखाद्याला चिंता, नैराश्य इत्यादींना सामोरे जावे लागते.

Arrow

पोट अस्वस्थ असल्यास, पुरळसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जेव्हा पोटात जळजळ होते तेव्हा त्वचेशी संबंधित समस्या लक्षणीय वाढतात.

Arrow

पोट तंदुरुस्त नसेल तर साखरेच्या तीव्र लालसेचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत गोड पदार्थांचे सेवन केल्याने पोटात बॅक्टेरिया वाढत असतात. त्यामुळे पोटाला सूजही आलेली असते.

Arrow

ही सर्वसाधारण माहिती आहे. काही समस्या आल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा