Photo Credit; instagram

बीटाच्या ज्यूसमध्ये मिसळा 'हे' 2 पदार्थ; रक्त वाढीसोबत मिळेल गुलाबी ग्लो...

Photo Credit; instagram

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे बऱ्याचजणांना दिवसभरात थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यामुळे त्यांचा चेहरासुद्धा निस्तेज दिसू लागतो.

Photo Credit; instagram

त्यामुळे निरोगी आणि फिट राहण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ नेहमी शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्याचा सल्ला देतात.

Photo Credit; instagram

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बाजारात बऱ्याचप्रकारचे टॅब्लेट्स आणि टॉनिक उपलब्ध असतात. मात्र, बीट नैसर्गिकरित्या शरीरातील रक्तवाढीचं काम करतं.

Photo Credit; instagram

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीटाचा योग्य वापर करणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

बीटासोबत आवळा आणि पुदीना मिसळून त्याचा ज्यूस बनवता येतो. हे तीन पदार्थ मिसळून ज्यूस बनवून तो प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत मिळते.

Photo Credit; instagram

न्यूट्रिशन किरण कुकरेना यांच्या मते, हा ज्यूस शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी आणि चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येण्यासाठी फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

बीटामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन C असतं. बीट, आवळा आणि पुदीन्याचा रस प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

हा ज्यूस शरीरातील कोलेजन वाढीसाठी उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. यामुळे त्वचा मुलायम होते आणि सुरकुत्या देखील दूर होतात. हा ज्यूस प्यायल्याने त्वचा अगदी तरुण दिसण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

हे तीन पदार्थांचा ज्यूस प्यायल्यानं तुमचं एकूण स्वास्थ्य चांगलं राहतं आणि दिवसभर उत्साहवर्धक राहण्यासाठी मदतशीर ठरतं. 

पुढील वेब स्टोरी

परफ्यूम शिवाय घामाच्या दुर्गंधीपासून सुटका! फॉलो करा 'या' टिप्स

इथे क्लिक करा