Arrow

सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिता? बदला सवय

Arrow

अनेकदा लोक सकाळी उठल्यानंतर कॉफी पितात आणि त्यानंतरच नाश्ता करतात. मात्र त्याचा तोटा तुम्हाला सहन करावा लागत असतो.

Arrow

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार सकाळी नाश्त्यापूर्वी कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिल्यामुळे आरोग्यासाठी ते हानीकारक असते.

Arrow

रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.

Arrow

डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संशोधनात असे दिसून आले आहे की झोपेचा त्रास आणि कॉफीचे सेवन या दोन्हीमुळे ग्लुकोजच्या मर्यादेपलीकडे वाढू शकते.

Arrow

रक्तातील ग्लुकोज हे ऊर्जेसाठी आवश्यक असते, मात्र कॉफीमुळे साखर वाढत असते. त्यामुळे ते एका मर्यादेत ठेवणे महत्वाचे असते.

Arrow

रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणाऱ्या लोकांच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे 50 टक्क्यांनी वाढत असते.

Arrow

संशोधनानुसार न्याहारीपूर्वी तुम्ही ब्लॅक कॉफी पिल्यास त्याचा तोटा तर होतोच मात्र त्याचवेळी तुमच्यामध्ये साखरेचेही प्रमाण वाढत असते.

Arrow

कॉफी एखाद्या व्यक्तीच्या कोर्टिसोलची पातळी खूप वेगाने वाढवते, मात्र ती सामान्य स्थितीत आणण्यासाठी थोडा वेळ लागतो.

Arrow

कोर्टिसोल हे तुमच्या शरीरातील मुख्य ताण संप्रेरक आहे आणि जर त्याची पातळी दीर्घकाळ उच्च राहिली तर तुम्हाला टाइप 2 मधुमेहाचा धोका असतो.

रात्री चुकूनही खाऊ नका या गोष्टी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा