लसूण खाण्याचे आहे जबरदस्त फायदे, हे गंभीर आजार होणारच नाहीत
शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलही नियंत्रित ठेवणं फार महत्वाचं आहे. जेव्हा ते शरीरात वाढू लागते तेव्हा मात्र ते सायलेंट किलर बनत असते.
शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकार, मज्जातंतूचे आजार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजार होत असतात.
उच्च कोलेस्टेरॉल शरीरात हळूहळू वाढू लागते तोपर्यंत शरीराचे खूप नुकसान झालेले असते.
शरीरातील कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. जेव्हा कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये जमू लागते तेव्हा मात्र थेट जीवालाही धोका पोहचू शकतो.
धोकादायक परिस्थिती हातळण्यासाठीच आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत जो तुमच्या औषधांसह शरीरातील खराब कोलेस्टेरॉलही कमी करण्यात मदत करू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण खाणे फायदेशीर आहे.
लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक संयुग असते जे केवळ खराब कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर रक्तातील साखर देखील कमी करते. त्यामुळे हृदय आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही एक कच्चा लसूण ठेचून रोज सकाळी एक ग्लास पाण्यासोबत खाऊ शकता.
तुम्ही लसूण चहा पिऊ शकता. यासाठी लसूण ठेचून एक कप पाण्यात मिसळा आणि थोडा वेळ उकळा. थोडे थंड झाल्यावर त्यात मध आणि लिंबाचा रस घालून प्या.
केवळ कोलेस्ट्रॉलच नाही तर लसणाच्या सेवनामुळे तुमची पचनक्रिया सुधारत असते. त्यामुळे साखर, हृदय-मेंदू, खोकला-सर्दी, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
ही माहिती सामान्य गोष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे कोणतेही उपचार अथवा औषधं घ्यायची असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Amruta Fadnavis यांचे साडी प्रेम.. 'हे' नवे फोटो पाहिले का?