Arrow

कच्च्या अंड्याचे सेवन आहे शरीरासाठी धोकादायक...

Arrow

अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे अनेक जण अंडी खात असतात.

Arrow

अनेकदा अनेक लोकं कच्चे अंडे खाताना दिसून येतात. 

Arrow

उकडलेले अंडे स्नायूंसाठी मजबूत असते. तर कच्च्या अंड्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्याचा फायदा डोळ्यांना होत असतो.

Arrow

मात्र तज्ज्ञांच्या मते, कच्चे अंडे खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचा धोकाही पोहचू शकतो. 

Arrow

काही लोकांना कच्च्या अंड्याच्या पांढऱ्या रंगाचीही अॅलर्जी असते, त्याचा तोटा शरीराला होत असतो.

Arrow

शरीरावर पुरळ येणे, सूज येणे, त्वचा लाल होणे, जुलाब होणे, खाज सुटणे किंवा डोळे पाणावणे असा त्रास संभवण्याची शक्यता असते.

Arrow

कच्च्या अंड्यामधील पांढरा भाग खाल्ल्यास शरीरात बायोटिनची कमतरता येण्याची शक्यता असते.

Arrow

बायोटिनला व्हिटॅमिन बी7 असंही म्हणतात. त्याच्या कमतरतेमुळे, लोकांना स्नायू दुखणे आणि केस गळणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Arrow

कच्च्या अंड्याच्या पांढऱ्यामध्ये असलेल्या प्रोटीनचे जास्त सेवन केल्यास किडनीशीसंदर्भात अनेक समस्या येऊ शकतात. 

Arrow

कच्ची अंडी खाल्ल्याने शरीरात साल्मोनेला बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते. यामुळे फूड पॉइजनिंग होऊ शकते.

IAS सृष्टी देशमुख दिसते खूपच सुंदर! पाहा 10 Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा