Arrow

तुम्हाला माहिती आहे का, पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो?

Arrow

माणसासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. शरीराचे सर्व काम व्यवस्थित करण्यासाठीच शरीराला पाण्याची प्रचंड मोठी गरज असते.

Arrow

घाम आणि लघवीद्वारे शरीरातून पाणी सतत बाहेर पडत असते. त्यामुळे शरीराला पाण्याची पुन्हा पुन्हा गरज असते.

Arrow

तुमच्या शरीराचे काम योग्यरित्या करण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसेल तर त्याला निर्जलीकरण असं म्हणतात. मानवी शरीरात 60 टक्के पाणी आणि मुलांमध्ये हेच प्रमाण 75 टक्क्यांएवढे असू शकते.

Arrow

ठराविक प्रमाणात पाणी मिळाल्याशिवाय कोणीही जास्त काळ जगू शकणार नाही. पाण्याशिवाय जगण्याची वेळ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.

Arrow

हवामान, वय, वजन, लिंग, पाणीयुक्त पदार्थांचे सेवन यांच्या आधारेच मानवी शरीरातील पाण्याची गरज ठरवत असते.

Arrow

हवामान उष्ण असेल तर शरीराला जास्त घाम येतो ज्यामुळे जास्त पाण्याची गरज असते. जर तुम्हाला ताप आला असेल आणि उलट्या होत असतील तर तुमच्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. जर तुम्ही व्यायाम करत असाल तरीही घामामुळे शरीरात पाणी कमी पडत असते.

Arrow

पण तुम्हाला माहिती आहे का की पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो?

Arrow

जे लोक वयोमानानुसार आजारी असतात ती माणसं  अन्न आणि पाण्याशिवाय फक्त काही दिवस किंवा काही आठवडेच जगू शकतात.

Arrow

जे लोक उपोषण करतात पण पाणी पिऊन राहतात ते पाण्यामुळे काही महिने किंवा त्याहून अधिक काळ ते जगू शकतात.

Arrow

एका संशोधनानुसार असा निष्कर्ष काढला गेला आहे की, अन्न आणि पाण्याशिवाय 8 ते 21 दिवसांपेक्षा जास्त काळ माणूस जगू शकत नाही.

Arrow

महिलांना दररोज 2.6 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात तर पुरुषांनी 3.6 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. 

Arrow

जर कोणी पुरेसे पाणी पीत नसेल तर शरीराला त्याचा फटका बसतो.  पाण्याशिवाय शरीरातील पेशी संकुचित होत असतात. मेंदूकडून शरीराला लघवी कमी करण्याचे संकेतही मिळू शकतात. त्याचा परिणाम किडनीवर होतो.

Arrow

रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडांना पुरेसे कार्य करणे गरजेचे आहे. पुरेशा पाण्याशिवाय किडनीचे काम थांबले जाऊ शकते. त्याचा परिणाम अनेक अवयवांवर होतो.

Arrow

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान बिघडते, इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतील, सांधे दुखू लागतील, मेंदूला सूज येईल, रक्तदाब कमी किंवा जास्तही होऊ शकतो.

Arrow

याशिवाय ऊर्जेचा अभाव, थकवा, क्रॅम्प्स, मेंदूला सूज येणे, किडनी निकामी होणे असे त्रास संभवू शकतात. 

तू तर नखरेल नार.. श्वेताचे फोटो अन् तुमच्याही काळजाचं होईल पाणी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा