Arrow

पायामध्ये 'ही' लक्षणं दिसताच, तुम्ही अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण... 

Arrow

आपल्या शरीराचा यकृत हा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव  आहे. त्यामुळे त्याच्याकडून अनेक प्रकारची कार्यही केले जाते. 

Arrow

अन्न पचवण्याबरोबरच ते आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करत असते.

Arrow

यकृत देखील पित्त तयार करते, त्यामुळे यकृतामधील घाण ते बाहेर टाकण्यास मदत करते.त्याचबरोबर ते आपल्या शरीरासाठी प्रथिनेही तयार करत असते. शरीराला लोह मिळण्यासाठी आणि पोषक तत्वांचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे कामही यकृत करत असते. 

Arrow

जेव्हा यकृत निकामी होते तेव्हा त्याची काही लक्षणे आपल्या शरीरावर दिसू लागतात. यकृत निकामी झाल्यामुळे पाय दुखू लागतात.

Arrow

जेव्हा यकृत चांगल्या प्रकारे काम करणे थांबवते, तेव्हा शरीराच्या पायाकडील भागात विषारी पदार्थ तयार होता, त्यामुळे पेरिफेरल एडीमाची समस्या उद्भवू शकते.

Arrow

पायांना खाज येणे हे देखील यकृताच्या आजाराचेच एक लक्षण आहे. जेव्हा यकृतातील पित्त नलिका खराब होतात तेव्हा असे होतात तेव्हा पायांना त्रास होण्यास सुरुवात होते. शरीरात पित्त जास्त झाल्यानंतर हात-पायांना खाज सुटू लागते.

Arrow

यकृताची समस्या निर्माण झाल्यानंतर पाय सुन्न होणे आणि हाता पायांना मुंग्या येणे सुरू होते. त्यानंतर डोळे आणि त्वचा पिवळी पडते, पोटदुखी आणि सूज, गडद लघवी, मळमळ आणि उलट्या अशा समस्यांनाही तोंड द्यावे लागते.

Arrow

जर यकृताचे आजार टाळायचे असतील तर आधी दारु पिणे टाळले पाहिजे, त्याचबरोबर धूम्रपान करणेही सोडून दिले पाहिजे.

केस गळती होत असेल तर आहारातील ‘या’ गोष्टी टाळा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा