आजच्या काळात अनेक लोकांना मानसिक आरोग्या ठिक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्याला तुमच्याच काही वाईट सवयीही कारणीभूत आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
कॉफी आणि चहा यासारख्या कॅफिनयुक्त पेयेचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे मानसिक आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.
तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमची आसनव्यवस्था ठेवत असाल तर त्याचाही तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
तुम्ही रोज 2 लीटर पेक्षा कमी पाणी पित असाल तर त्याचाही मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.कारण मेंदूचे कार्य जर व्यवस्थित पाहिजे असेल तर योग्य पाणी तुमच्या शरीरामध्ये गेलेच पाहिजे.
अनेकदा लोकं वेळेवर आहार घेत नाहीत, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही कमी जास्त होत असते. त्यामुळेच तणाव आणि नैराश्य येते.
आजकालच्या लोकांना वेब सिरीज पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे लोक वेळेवर झोपत नाहीत आणि तशी विश्रांतीही मिळत नाही. ही सवय तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही घातक ठरू शकते.
तुम्ही वारंवार जंक फूड खात असाल तर आता मानसिक आरोग्यासाठी काळजी घ्या. कारण ही सवय तुमचे मानसिक आरोग्य धोक्यात आणू शकते.
जर तुम्ही खूप जास्त विचार करत असाल तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण जास्त विचार केल्याने चिंता आणि नैराश्य येते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...