भारतीय पाककृतीतील जिरे हा एक प्रमुख घटक आहे. प्रत्येक घरात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. तसेच हे अनेक दशकांपासून आयुर्वेद आणि प्राचीन औषधांचाही जिरे हा एक भाग आहे.
यामध्ये असे गुणधर्म आहेत जे पोट आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्याचे रोज सेवन केल्यास अपचन, सूज येणे आणि गॅस कमी होतो.
जिरे असलेल्या पाण्याचे सेवन केल्याने शक्तिशाली आणि नैसर्गिक डिटॉक्सिफायर बनत असते. जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
त्यामध्ये मॅंगनीज, लोह, कॅल्शियम फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे त्याचे रोज सेवन केले तर शरीरात चरबी जमा होत नाही. त्याच बरोबर वजनही झपाट्याने कमी होते.
त्याच बरोबर जिऱ्यामध्ये पचन आणि चयापचय मजबूत करणारे पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
हे कोलेस्टेरॉल रोखण्यातही मदत करते. ज्यामुळे तुम्ही हृदयाशी संबंधित आजार टाळू शकता. हे हानिकारक ट्रायग्लिसराइड्सची पातळीदेखील कमी करत असते.
तुम्ही रात्री जिऱ्याचे पाणी सेवन केल्यास तुमची झोपही सुधारते. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम चांगल्या झोपेसाठी मदत करते.
जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते आरोग्यासाठी तसेच चमकदार त्वचेसाठीही उपयुक्त आहेत.
या बातमीत दिलेल्या सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत, त्यामुळे कोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.