Arrow

उच्च रक्तदाबाची 'ही' आहेत धोकादायक लक्षणे

Arrow

उच्च रक्तदाब हा एक आजार असला तरी त्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र योग्य ती काळजी नाही घेतली तर मात्र ते तुम्हाला धोकादायक ठरु शकते.

Arrow

तुमच्या आरोग्याला कोणतीची हानी पोहचवायची नसेल तर उच्च रक्तदाबाच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

Arrow

ज्यांना रक्तदाबाच्या त्रास होतो, त्या रुग्णांना अनेकदा डोकेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे रक्तदाब वाढला तर त्याची वेदना असह्य होत असते.

Arrow

तुम्हाला खूप थकवा जाणवणे हे देखील उच्च रक्तदाबाचेच लक्षण आहे. जर तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल तर तुमचे बीपी तपासून घ्या.

Arrow

छातीत दुखणे हेदेखील उच्च रक्तदाबाचे गंभीर लक्षण आहे. त्यामुळे रक्तदाब वाढला तर मात्र छातीत दुखते.

Arrow

रक्तदाब वाढला की श्वासासंबंधीच्या समस्याही जाणवू लागतात. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे हाच एकमेव उपाय असतो.

Arrow

अनियमित हृदयाचे ठोके हे देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Arrow

उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांच्या नसांना त्रास होतो त्यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमकुवत होत असते.

Arrow

ही सांगितलेली लक्षणे उच्च रक्तदाबाचे गंभीर लक्षणं आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना अनेकदा त्याचा असह्य त्रास होतो. त्यामुळे आधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Weight Loss साठी खास वर्कआउट्स, अभिनेत्रींसारखी होईल फिगर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा