दिवसभर ऑफिसमध्ये एका जागी बसून काम असल्यामुळे व्यायाम करण्यासाठी अनेकांना पुरेसा वेळ मिळत नाही. अशा लोकांसाठी काही सेकंदांचं वॉक सुद्धा फायदेशीर ठरतं, कसं ते जाणून घ्या.
Photo Credit; instagram
एका रिसर्चनुसार, 10 सेकंदांपर्यंत माइक्रो-वॉक सुद्धा आरोग्यासाठी चांगलं फायद्याचं ठरू शकतं.
Photo Credit; instagram
जे लोक मध्ये ब्रेक घेत 10 ते 30 सेकंद वॉक करतात, ते जास्त वेळ सतत चालणाऱ्या लोकांपेक्षा जास्त कॅलरीज बर्न करत असल्याचं रिसर्चमध्ये आढळून आलं आहे.
Photo Credit; instagram
हा रिसर्च करताना काहींनी मध्ये ब्रेक घेत अगदी थोड्या वेळासाठी वॉक केलं तर काही लोक 7 मिनिटे सतत चालले.
Photo Credit; instagram
ज्यांनी 'मायक्रो-वॉक' केलं त्यांची एनर्जी लांब अंतर चालणाऱ्या किंवा पायऱ्या चढणाऱ्यांच्या तुलनेच लवकर संपल्याचं रिसर्चमध्ये आढळून आलं.
Photo Credit; instagram
शरीरातील एनर्जी लवकर संपल्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.
Photo Credit; instagram
अशात काम करतेवेळी अधिक वेळ बसून राहण्याऐवजी मध्ये ब्रेक घेत राहा. यामुळे शरीर निरोगी राहतं, कॅलरीज वेगानं बर्न होतात आणि मूडसुद्धा चांगला राहतो.
Photo Credit; instagram
तज्ज्ञ नेहमी 7000 ते 8000 पावलं चालण्याचा सल्ला देतात. यामध्ये कमीत कमी 20 ते 30 मिनिटे वेगानं वॉक केलं पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तरुणपणातील 'या' चुका... आयुष्यभर होत राहिल मोठं नुकसान