उसाचा रस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताजेतवाने राहण्यासाठी मदत करतो. त्याचा तुमच्या शरीराला फायदाही होत असतो. मात्र काही लोकांना त्याचा तोटाही होण्याची शक्यता असते.
उसाचा रस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो.
उसामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असते आणि त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोहाचे प्रमाण चांगले असते.
उसाचा रस उन्हाळ्यात हायड्रेट ठेवतो. त्यासोबतच हे पचनासही त्याची मदत होते, आणि किडनीसाठी ते चांगले मानले जाते.
उसाचा रस काही लोकांसाठी मात्र हानिकारक आहे. त्यामुळे त्याचे नेमके तोटे काय आहेत ते तुम्हाला सांगणार आहोत.
त्यात खूप जास्त कॅलरीज असतात. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने वजनही वाढते.
उसाच्या रसात पोलिकोसनॉल असते ज्यामुळे चक्कर येणे आणि निद्रानाशाचा त्रास होतो.
उसाचा रस रक्त पातळ करतो, त्यामुळे तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर ते पिणे टाळले पाहिजे.
उसाचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी प्रचंड वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन करणे टाळावे.