आता कोलेजनची चिंताच करू नका; 'हे' सूपरफूड्स ठरतील फायद्याचे
Photo Credit; canva
सध्याच्या वातावरणातील उष्णतेमुळे जास्त ऊन, घाम आणि डिहायड्रेशनमुळे त्वचेला नुकसान पोहचू शकतं. यामुळे कोलेजनची पातळी कमी होऊ शकते.
Photo Credit; canva
कोलेजन एक प्रकारचं प्रोटीन असून ते त्वचा तरुण, टाइट आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. काही अशा पदार्थांविषयी जाणून घ्या, जे शरीरातील कोलेजनच्या निमिर्तीसाठी कारणीभूत ठरतात.
Photo Credit; canva
अशा 8 सूपरफूड्स बद्दल जाणून घ्या, ज्यांचं सेवन केल्यानं त्वचा नैसर्गिकरित्या टाइट आणि ग्लोइंग दिसते.
Photo Credit; canva
सिट्रस म्हणजेच आंबट पदार्थ व्हिटॅमिन C चे उत्तम स्त्रोत असतात. हे कोलेजन वाढीसाठी आवश्यक मानले जातात. रोज सकाळी लिंबू पाणी किंवा मोसंबीचा ज्यूस प्यायल्याने त्वचा टाइट आणि ग्लोइंग होते.
Photo Credit; canva
पपई आणि आंबे उन्हाळ्यातील सुपरफ्रूट्स असून त्यामध्ये व्हिटॅमिन A आणि C जास्त प्रमाणात आढळतात. हे त्वचेला पोषण देतात आणि अँटी-ऑक्सीडेंट्स प्रमाणे काम करतात.
Photo Credit; canva
टोमॅटोमध्ये असलेला लाइकोपिन घटक त्वचेचा उन्हापासून बचाव करतो आणि कोलेजनच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. सॅलड किंवा सूपमध्ये याचा वापर करू शकता.
Photo Credit; canva
पालक आणि ब्रोकलीसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि लोह अधिक प्रमाणात आढळतं. यामुळे कोलेजनला मजबूती मिळते आणि त्वचेला आतून पोषण मिळते.
Photo Credit; canva
बदाम, चिया सीड्स आणि आळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि झिंक असतं. हे घटक कोलेजनचं उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर असतात. दररोज मूठभर हे पदार्थ भिजवून खाल्ल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
Photo Credit; canva
अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोलाइन आणि माश्यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळतं. हे कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी आणि त्वचेचं स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयुक्त असतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचं सेवन फायदेशीर ठरतं.
Photo Credit; canva
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि जांभळासारख्या फळांमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात आढळतात. हे त्वचेवरील सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि कोलेजन वाढीसाठी फायदेशीर ठरतात.
Photo Credit; canva
कोलेजनच्या निर्मितीसाठी शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने आणि नारळ पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड आणि हेल्दी राहते.