बेरी : स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीसारख्या बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन सी असतात. यामध्ये कॅलरीज कमी असतात, याशिवाय तुमची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होवू शकते.
टोमॅटो : टोमॅटोमध्ये कॅलरीज कमी असतात आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरचे देखील प्रमाण भरपूर असते. टोमॅटो तुम्ही सॅलड्स म्हणून किंवा सँडविचमधून स्नॅक म्हणून खाऊ शकता.
मशरूम : जर तुम्हाला मशरुम खायला आवडत असेल तर ते तुमच्यासाठी चांगले आहे. मशरूममध्ये कॅलरीज कमी असतात. सोबतच यात पोटॅशियम, सेलेनियम, रिबोफ्लेविन, नियासिन आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक असतात.
कलिंगड : गोड असूनही कलिंगडामध्ये कमी कॅलरीज असतात. कलिंगड वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होत नाही. कलिंगडमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक शरीराला अधिक फायदे देतात.
काकडी : काकडी कुरकुरीत असते आणि खाल्यानंतर ताजेतवाने वाटते. यामुळे काकडी एक हेल्दी स्नॅक मानला जातो. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, यामुळे उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी एक चांगला पर्याय मानला जातो.