Photo Credit; instagram

Arrow

162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो?

Photo Credit; instagram

Arrow

162 किलो वजन असलेल्या आयटी इंजिनियरचे वजन इतके वाढले होते की डॉक्टरांनी त्याला त्याच्या भविष्यासाठी धोका सांगितला होता.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचवेळी त्याच्या वाढलेल्या वजनामुळे लोक त्याची खिल्ली उडवत होते, त्यामुळे तो अनेकदा डिप्रेशनमध्ये गेला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण त्याने हार मानली नाही आणि ६५ किलो वजन कमी केलं. आता त्याचे वजन ९७ किलो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मतीन असे वजन कमी केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पुण्याचा रहिवासी आहे. इतके वजन कमी करायला त्याला अडीच वर्षे लागली.

Photo Credit; instagram

Arrow

41 वर्षांचा मतीन सांगतो, 'मी 6XL आकाराचा टी-शर्ट आणि 62 इंच कंबर असलेली पॅन्ट घालत असे. नुसती ५ मिनिटे चालून थकून जायचो.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा कोरोना आला मी माझ्या आरोग्याची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी मला वजन कमी करण्याचा सल्ला दिला, अन्यथा मला काहीही होऊ शकते कारण मला मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'कोरोना काळात मी वजन कमी करण्याचा सल्ला घेतला आणि इंटरनेटवर शोधले. यानंतर मी ट्रेनर सिद्धेश वोझाला यांच्याकडे ट्रेनिंग सुरू केली.'

Photo Credit; instagram

Arrow

'लहान गोष्टींनी सुरुवात करून, मी 2.5 वर्षांत सुमारे 65 किलो वजन कमी केले. वजन कमी करण्यासाठी मी माझ्या जेवणाचे प्रमाण लक्षात घेऊन जेवायला सुरूवात केली.'

Photo Credit; instagram

Arrow

सुरुवातीला 2400 कॅलरीज घेतल्या आणि नंतर 1800 कॅलरीजवर गेल्या. मग एकेकाळी, त्याने कॅलरीज कमी केल्या नाहीत तर शारीरिक हालचाली वाढवल्या.

Photo Credit; instagram

Arrow

'मी अंडी, चिकन, चपाती, भाज्या, डाळी, कोशिंबीर, भात असे सर्व काही खाल्ले. पण कॅलरीज मोजून.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी खाल्लेल्या अन्नामुळे माझे वजन कमी झाले. मला काहीही खाणे सोडून देण्याची गरज वाटली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी 5 मिनिटांच्या चालण्याने शारीरिक हालचाली सुरू केल्या. त्यानंतर 10, 15 आणि नंतर 20 मिनिटे चालायला सुरुवात केली.'

Photo Credit; instagram

Arrow

'हळूहळू माझी ताकद वाढत गेली आणि आज मी अडीच तास वर्कआउट करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'वर्कआउटमध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डिओचा समावेश आहे. माझे लक्ष्य 75 किलोपर्यंत पोहोचण्याचे आहे. इतके वजन कमी केल्यानंतर माझा मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आला आहे.'

Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर 'हा' डाएट करा फॉलो

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा