सध्याच्या काळात खराब आहार आणि ताणतणावाच्या कारणामुळे अनेक लोकांना केसासंबंधित समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
तुमच्या खाण्याचा थेट परिणाम तुमच्या केसांवर होत असतो. याच कारणामुळे आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या केसांवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही.
साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळणे, आणि इतर अनेक गोष्टींचा त्रास तुम्हाला संभवत असतो. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या केसांवर होत असतो.
प्रक्रिया केलेल्या कोणत्याही खाद्यपदार्थांमुळेही केसावर थेट परिणाम होतो. त्याचमुळे केसगळतीला प्रारंभ होतो.
फास्ट फूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या शरीरात चरबी वाढणारे पदार्थ असतात. त्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो.
अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळेही केसांवर विपरित परिणाम होतो. तुम्हाला डिहायड्रेशनला सामोरे जावे लागत असेल तर त्याचाही खूप वाईट परिणाम केसांवर होत असतो.
केसांसाठी प्रथिने खूप महत्त्वाचे मानली जातात मात्र या परिस्थितीत कमी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास केस कमकुवत होतात आणि केस गळण्याचे प्रमाण वाढत जाते.
केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील लोहाची कमतरता. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे केसांच्या आरोग्यासाठी गरजेचे असते.
कॅलरीजचे सेवन कमी केल्यामुळेही केसावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे केस गळणे, केस फुटणे, विरळ होण, केस पांढरे होणे अशा समस्या तुम्हाला येऊ शकतात.
Belly Fat: हिवाळ्यात ‘ही’ एक गोष्ट खाल तर, एक इंचही वाढणार नाही कंबर!