Photo Credit; instagram

आंबे खाल्ल्यानंतर होतं भलतंच काही.. ज्याचा तुम्ही विचार केला नसेल!

Photo Credit; instagram

उन्हाळा म्हणजेच आंब्यांचा ऋतू. यामध्ये लोक अगदी आवडीनं आंबे खाण्याचा आनंद लुटतात.

Photo Credit; instagram

मात्र, आंबे खाल्ल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर मुरुमं, पिंपल्स यांसारख्या त्वचेसंबंधी बऱ्याच समस्या उद्भवतात.

Photo Credit; instagram

ही समस्या जरी सामान्य असली तरी याकडे दुर्लक्ष केल्याने बरीच गंभीर लक्षणं देखील पाहायला मिळू शकतात.

Photo Credit; instagram

तुम्हीसुद्धा अशा समस्येने ग्रासलेले असाल तर यासंबंधी काही टिप्स जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने यापासून तुम्हाला सुटका मिळवता येईल.

Photo Credit; instagram

खरंतर, आंब्यामध्ये एक उरुशिओल नामक ऑइली घटक आढळतो. याच्या थेट संपर्कात आल्यामुळे खाज, पुरळ, लालसरपणा किंवा फोड येऊ शकतात.

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात आंबे खाल्ल्याने बऱ्याचदा घामामुळे ओल्या त्वचेवरील एलर्जीचा धोका वाढू शकतो.

Photo Credit; instagram

बहुतेक वेळा कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन आंबे पिकवले जातात. हे केमिकल त्वचेवर जळजळ होण्याच्या समस्येसाठी कारणीभूत ठरू शकतं.

Photo Credit; instagram

यापासून बचाव करण्यासाठी आंबा कापण्याआधी तो स्वच्छ धुवून घ्या. जेणेकरुन असे घातक केमिकल्स आणि घटक निघून जातील.

Photo Credit; instagram

जर तुमची त्वचा सेन्सेटिव्ह असेल तर आंबा चिरताना ग्लोव्हस घाला किंवा कोणा दुसऱ्याला तो चिरण्यासाठी सांगा.

Photo Credit; instagram

अनेक लोक आंबा कापून खाण्याऐवजी तो चोखून खाणं पसंत करतात. मात्र यामुळे 'मँगो माउथ'ची समस्या उद्भवू शकते. यामुळे ओठ आणि हनुवटीभोवती पुरळ किंवा जळजळ होऊ शकते.

Photo Credit; instagram

शक्य असल्यास, आंबा खाण्यापूर्वी 30 ते 60 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. यामुळे आंब्याची उष्णता कमी होते आणि जळजळीच्या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss: 'या' 7 भाज्यांमुळे तुमची चरबी झटपट वितळेल!

इथे क्लिक करा