Valentine Gifts: 'व्हॅलेंटाईन डे'ला कोणतं गिफ्ट द्यावं?

Valentine Day चं काउंट डाऊन आता सुरू झालं आहे.

यादिवशी प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी काहीतरी खास करण्याचं ठरवतं. काहींनी तर तसा प्लॅनही केला असेल.

तरूणाईमध्ये तर, यादिवशी एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. व्हॅलेंटाईन वीकच्या आधीच त्यांना गिफ्ट काय द्यायचं हा प्रश्न पडतो.

व्हॅलेंटाईनला गिफ्ट देण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे केक, फुलं, हार्ट शेपचे बलून असं बरंचसं उपलब्ध असतं.

मात्र, काहीतरी वेगळं देण्यासाठी आपण फुलांऐवजी एखादं रोपटंही देऊ शकतो.  

हँडमेड ग्रिटींग्स, आकर्षक डेकोरेशन करूनही आपण ते गिफ्ट म्हणून देऊ शकतो.   

कोणत्याही गोष्टीची सुरूवात ही तोंड गोड करून केली जाते, त्यामुळे विकतचं चॉकलेट घेण्यापेक्षा घरी बनवलं तर, ते उत्तम ठरेल.

चॉकलेट देताना ते असंच देण्यापेक्षा हँडमेड बॉक्समध्ये रॅप करूनही देऊ शकता.

यादिवशी केवळ महागड्या वस्तू द्याव्यात असं काही नसतं. लक्ष वेधणाऱ्या छोट्या गोष्टीही गिफ्ट करता येतात.

व्हॅलेंटाईनला कपल रिंग, चेन, लव्ह कार्ड, किचेन, फोटो फ्रेम देऊनही सर्प्राइझ करू शकता.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories