कपिल शर्मा सध्या कॉमेडियन म्हणून सिनेसृष्टीतील टॉप स्टार्सपैकी एक आहे. कारण त्याच्या विनोदी शैलीमुळे आणि स्पष्टवक्तेपणासाठी तो खास ओळखला जातो.
द कपिल शर्मा शो'मध्ये त्याने अनेक कलाकारांवर अनेक विनोद केले आहे. त्या कार्यक्रमात एकदा अक्षय कुमार आला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, 'आपल्याला मिळालेली जाहिरात अक्षयने काढून घेतली होती.'
कपिल म्हणाला की, 'अक्षय कुमार वर्षभर त्याच्या चित्रपटाच्या कामात तो व्यस्त असतो. मात्र त्याने त्या व्यस्ततेतूनही एका कॉमेडियनची जाहिरात काढून घेतली होती.'
ही जाहिरात कपिलला मिळताच कपिलने आता अक्षय कुमारचा कसा बदला घेतला याची चर्चा सुरु झाली आहे.
कपिलने सांगितलेल्या 'त्या' आठवणीने अक्षय कुमारलाही हसू आवरता आलं नव्हतं. मात्र त्यावेळी अक्षय म्हणाला की, 'ही जाहिरात कपिलला मिळाल्यामुळे मला नक्कीच आनंद झाला आहे.'
कपिल शर्माचा शो बंद झाल्यानंतर आता तो द क्रू या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये करीना कपूरही असणार आहे.
कपिल शर्माने सांगितलेल्या या आठवणीमुळे आता कपिलने जाहिरातीतून अक्षयचा कसा बदला घेतला आहे, त्याच्या चर्चा सिनेसृष्टीत रंगल्या आहेत.