Arrow

जिममध्ये न जाताही 20 दिवसात घालवा पोटाची चरबी...

Arrow

जगातील कोणत्याही व्यक्तीला स्लिम आणि ट्रिम दिसण्याची इच्छा असते. इच्छा असली म्हणून लगेच काहीही होत नसते. मात्र वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायामशाळेत घाम गाळत असतात, तर डाएटिंगसाठीही वेगळं काही तरी करत असतात.

Arrow

व्यायाम आणि डाएटिंग हे असले तरी तुमच्या स्लिम आणि ट्रिम दिसण्यासाठी मात्र तुमची जीवनशैली ही शिस्तबद्धच असली पाहिजे. त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या आहाराचीही काळजी घ्यावी लागणार आहे.  

Arrow

फक्त एवढे करुन लगेच वजन कमी होत नाही. त्यासाठी तुमची पचनसंस्था आणि पचनप्रक्रियाही चांगली ठेवावी लागते. 

Arrow

त्यामुळेच वजन कमी करण्याच्या आम्ही तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहोत. त्या पद्धतीने तुम्ही सहज तुमचे वजनही कमी करु शकता. 

Arrow

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला आहार घेणे कठीण जात असले तरीही तुम्ही तुमचे वजन कमी करु शकता. त्यासाठी तुमचा आहार त्यासाठी संतुलित करावा लागणार आहे.

Arrow

चांगल्या आहारासाठी तुमच्या आहारात जास्तीत जास्त पोषक तत्वांचा समावेश करा. वजन कमी करण्यासाठी प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे सर्व घटक आवश्यक असतात.

Arrow

त्यामुळे तुमच्या आहारात फळे, भाज्या, धान्ये, अंडी, मांस आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचाही वापर करा.  बाहेरील तळलेले पदार्थ तुम्ही खाणे सोडून दिले तर मात्र अगदी 20 ते 30 दिवसात तुमचे वजन कमी होऊ शकते.

Arrow

वजन कमी करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक व्यायाम. हलका व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जिममध्येच गेले पाहिजे असं नाही तर हलक्या प्रकारचा व्यायाम तुम्ही घरीही करु शकता.

Arrow

तुम्हाला नोकरी असली तरीही तुम्ही चालण्याची सवय ठेवा. सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्याची सवय ठेवा. कारण तुम्ही रोज 15-20 मिनिटं तुम्ही चाललेच पाहिजे.

Arrow

यामधील माहिती ही सामान्य माहितीवर असून कोणतेही उपचार, आहार घेण्यापूर्वी मात्र एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

व्हिस्कीची कधी बनते स्कॉच ? मद्यप्रेमींनाही याचे उत्तर नसेल माहित…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा