Arrow

लैंगिक आरोग्य आणि आर्युमान वाढवण्यासाठी या गोष्टींकडे द्या लक्ष

Arrow

आपल्या आरोग्यासाठी व्यायाम चांगलाच असतो हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र व्यायाम फक्त शरीर सुधारतो असं नाही तर तुमच्या शारीरिक क्षमतेबरोबरच तुमच्या मानसिक आरोग्यही सुधारते.तुमच्या मूडपासून ते अगदी तुम्हाला चांगली झोपे येईपर्यंतच्या गोष्टी या व्यायामामुळे सुधारत असतात.

Arrow

व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.  हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही त्यामुळे कमी होतो. व्यायाम जर रोज असेल तर जुना हृदयरोगही लांब जातो.

Arrow

तुमची कोलेस्टेरॉलची पातळी वाढत असेल तर व्यायामामुळे ती नियंत्रित होते. व्यायामामुळे तुमच्या एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यासही मदत होते.

Arrow

तुम्हाला कधी तणाव जाणवत असेल तर ती पातळी व्यायामामुळे नियंत्रित राहते. व्यायामामुळे तुमचा मूड सुधारण्यासदेखील मदत होते. संशोधनानुसार असं सांगितले जाते की, सकारात्मक विचार करण्यास व्यायाम महत्वाचा आहे. तुम्हाला जाणवणारा मानसिक तणाव, थकवा, राग आणि गोंधळही व्यायामामुळे कमी होतो. 

Arrow

व्यायामामुळे रक्तातील शुगर नियंत्रित मदत होते. मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. तसेच उच्च रक्तदाब आणि शुगरही नियंत्रित राहते. 

Arrow

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, पक्षाघात आणि किडनीच्या आजाराची शक्यता असते.  एरोबिक व्यायाम म्हणजेच धावणे, पोहणे, सायकल चालवणे यामुळे रक्तदाब कमी होतो. 

Arrow

व्यायामामुळे एंडोर्फिन आणि इतर संप्रेरके बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुमची झोप चांगली होते. निद्रानाश असलेल्या लोकांना नियमित व्यायामामुळे चांगली झोप होते. 

Arrow

लैंगिक आरोग्यासाठीही व्यायाम हा खूप महत्त्वाचा घटक आहे. नियमित व्यायामामुळे सेक्स ड्राइव्ह, कार्यक्षमता आणि महत्वाचे म्हणजे तुमचा लैंगिक आनंद वाढू शकतो.

गौरी ओरडत होती, अन् रडतही होती, शाहरुखची एक भयानक आठवण

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा