बाळासाठी Breast Milk साठवून ठेवण्याची 'ही' आहे योग्य पद्धत...

आईचं दूध बाळासाठी पौष्टिक मानलं जातं. त्यातून बाळाला आवश्यक पोषक तत्व मिळतात. 

6 महिन्यांपर्यंत बाळासाठी आईचं दूध महत्त्वाचं असतं.

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा काळ फार कठीण असतो. नोकरीमुळे बाळ 6 महिन्याचं होण्यापूर्वीच त्यांना बाहेरचं दूध पाजावं लागतं. 

मात्र, काळ बदलला तसं तंत्रज्ञानही बदललं... आता आईच्या दूधाचा साठाही करता येतो.

यामुळे बाळाला भूक लागेल तसं आईचं दूध पाजता येऊ शकत.

जर साठवलेलं आईचं दूध बाळाला पाजत असाल, तर ते साठवण्याची योग्य पद्धत जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

आईचे दूध साठवण्यासाठी फूड- ग्रेड कंटेनर वापरा. विशेषता ते काचेचं तसेच हवाबंद असावं.

डिस्पोजेबल बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कधीही साठवू नका.

आईचे दूध साठवल्यानंतर बाहेर ठेवल्यास ते 4 तास टिकते नंतर, ते खराब होते. जर फ्रीझरमध्ये ठेवत असाल तर ते 4 दिवस ताजे राहते.

गोठलेले आईचे दूध वितळण्यासाठी, ते कधीही गरम किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका. दुधाचा डबा नेहमी कोमट पाण्यात ठेवा.

आईचं दूध बाळासाठी अमृत असल्यासारखचं असतं. हे प्रथिने आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असतं. जर साठवलेलं आईचे दूध बाळाला पाजत असाल, तर ते साठवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories