प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, 'मेला नाहीस तर गळफास घे'

Photo Credit facebook

Arrow

उत्तर प्रदेशमध्ये एक घटना अशी घडली आहे ज्यामुळे काहींचा तर प्रेमावरून विश्वासच उडेल.  

Photo Credit facebook

Arrow

अंकित आणि चित्रा या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, पण हे नाते चित्राच्या घरच्यांना मान्य नव्हते.

Photo Credit facebook

Arrow

त्यामुळे चित्राच्या घरच्यांनी तिचे लग्न हेमंत नावाच्या व्यक्तीशी लावले. यानंतरही अंकित आणि चित्रा भेटत होते.

Photo Credit facebook

Arrow

मात्र, अचानक 16 मार्च रोजी चित्राने फोन करून अंकितला उत्तर प्रदेशमधील एटा बसस्थानकावर भेटायला बोलावले.

Photo Credit facebook

Arrow

दोघेही थोडा वेळ बोलले. यावेळी चित्राने त्याला कोल्ड्रिंक दिले आणि अंकित ते प्यायला. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी निघून गेले.

Photo Credit facebook

Arrow

अंकित बसमध्ये बसल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचवेळी चित्राने त्याला फोन केला तेव्हा त्याला बोलताना धाप लागत होती.

Photo Credit facebook

Arrow

काही वेळानंतर चित्रा अंकितला म्हणाली, 'जर तू मेला नाहीस तर गळफास घेऊन जीव दे.'

Photo Credit facebook

Arrow

अंकितने लगेच फोन करून भावाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर अंकितचा भाऊ लगेच त्याच्याकडे पोहोचला.

Photo Credit facebook

Arrow

अंकितला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Photo Credit facebook

Arrow