Photo Credit; नितिन उळे

Arrow

Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

चंद्रपूर येथे असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत असताना त्यांच्यासमोर तारू आणि शंभू हे दोन वाघ आले. 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

वाघांना पाहून पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी वाघांचे फोटो आणि व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

त्यानंतर अचानक दोन वाघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. हे पाहून पर्यटक स्तब्ध झाले, जिप्सीसमोर दोन वाघ आपापसात भांडत होते. 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

ही लढाई सुमारे अर्धा तास चालली, लढत असताना वाघ पर्यटक जिप्सींच्या अगदी जवळ येत होते, 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

वाघांच्या लढाईचं हे फारच दुर्मिळ दृश्य होतं, या झुंजीत दोन्ही वाघ जखमी झाले आहेत. यावेळी दोन्ही वाघ हे रक्तबंबाळ झाल्याचंही पाहायला मिळालं.

Photo Credit; नितिन उळे

Arrow

हे दुर्मिळ दृश्य मुंबईचे वन्यजीव छायाचित्रकार नितीन उळे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

नितीन उळे यांनी सांगितले की, ते ताडोबा बफर झोनच्या देवाडा गेट येथून 2 डिसेंबर रोजी सफारीसाठी गेले होते. ते अनेकदा ताडोबात जंगल सफारीसाठी येतात. 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

त्याचवेळी वाघ एकमेकांवर मधूनमधून हल्ले करत होते, व्हिडीओमध्ये पर्यटकांच्या वाहनांच्या अगदी जवळ वाघांची झुंज सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. 

Photo Credit; नितिन उळे

Arrow

पर्यटकांसोबत उपस्थित सर्व जिप्सी चालक आणि मार्गदर्शक अनुभवी होते, त्यामुळे त्यांनी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.

Team India सोबत विमानात कोण होती ती 'मिस्ट्री गर्ल', पाहा PHOTO

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा