Vasai Traffic Police: भयंकर... वाहतूक पोलिसाला नेलं फरफटत
वसईमधील वसंत नगरी सिग्नलवर एक धक्कादायक घटना घडली आहे.CCTV कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
वसईत वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी रविवारी (12 जानेवारी) संध्याकाळी ड्युटीवर होते.
यावेळी सिग्नल तोडणार्या वाहन चालकाला चौधरी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.
गाडी थांबविण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी गाडीच्या बोनेटवर पडले तरी, वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली.
वाहन चालकाने वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी यांना अक्षरश: फरफटत नेलं.
जवळजवळ दीड किलोमीटर चौधरी कारच्या बोनेटवरच होते.
दरम्यान, पुढे जाऊन वाहनांच्या गर्दीमुळे गाडी थांबली आणि चौधरी यांची सुटका झाली.
सोमनाथ चौधरी हे या प्रकारात जखमी झाले असून थोडक्यात बचावले आहेत.
याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी वाहन चालक जाफर सिद्दीकी याला अटक केली आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
और देखें...
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?