Arrow

पुतिन यांना हृदयविकाराचा झटका

Arrow

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्तामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

Arrow

व्लादिमीर पुतिन यांना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त सोशल मीडियावरुन व्हायरल होताच अनेकांना धक्का बसला.

Arrow

हे वृत्त येताच असंही सांगण्यात आले की, पुतिन हे त्यांच्या बेडजवळच पडलेले आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्याचा दावा करण्यात आला.

Arrow

पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बेडजवळ पडलेले पाहिले होते.

Arrow

व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच त्यांच्या सुरक्षा रक्षाकांनी तात्काळ डॉक्टरांना पाचारण केल्याचेही सांगण्यात आले.

Arrow

तर या एका वृत्तानुसार असाही दावा केला जात आहे की, त्यांच्या सुरक्षा रक्षकानेच पुतिन यांच्या वैद्यकीय पथकाला बोलवून त्यांच्यावर उपचार सुरु केले. 

kriti Sanon सारखी ‘ही’ चूक कराल तर तुमच्या चेहऱ्यावर डाग राहतील कायम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा