Photo Credit; Social Media

Arrow

'या' काका-पुतण्यांनी महाराष्ट्राचं राजकारण टाकळं ढवळून

Photo Credit; Social Media

Arrow

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्याच्या घडीला राष्ट्रवादीतील बंड हा चर्चेचा विषय आहे.

Photo Credit; Social Media

Arrow

अजित पवारांनी रविवारी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारला आपला पाठिंबा दर्शवत उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Photo Credit; Social Media

Arrow

यावेळी अजित पवारांनी राजकारणात घडवणाऱ्या शरद पवारांची अर्थात सख्ख्या काकांची साथ सोडून राजकारणात वेगळी वाट निवडली.

Photo Credit; Social Media

Arrow

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही 2006 साली काका बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून मनसेची स्थापना केली.

Photo Credit; Social Media

Arrow

असं म्हटलं जातं की, राज ठाकरेंचा संघटनेवरचा हक्क जास्त होता, पण त्यांना हवं तेवढं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं. निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवलं जात होतं.

Photo Credit; Social Media

Arrow

याशिवाय, त्यांना घेतलेले निर्णय पटत नव्हते. त्यामुळे त्यांचा एक प्रकारे कोंडमारा सुरू होता. यामुळे राज ठाकरेंनी हे पाऊल उचललं.

Photo Credit; Social Media

Arrow

महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका पुतण्याची जोडीही सर्वांच्या माहितीची आहे.

Photo Credit; Social Media

Arrow

गोपीनाथ मुंडे राजकारणात असताना लोकसभेवर निवडून गेले. यामुळे विधानसभा मतदारसंघातून त्यांची कन्या पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली.

Photo Credit; Social Media

Arrow

धनंजय मुंडेंकडे गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार मानलं जातं होतं. पण काकांच्या निर्णयामुळे त्यांचं नातं दुरावलं. धनंजय यांना विधानपरिषदेत आमदारकी मिळाली आणि त्यांनी राष्ट्रवादीची साथ धरली.

Photo Credit; Social Media

Arrow

सुनील तटकरे आणि माजी आमदार अवधूत तटकरे या काका-पुतण्याचा वादही चांगलाच चर्चेत आहे. कारण, होतं सुनील यांचा मुलगा अनिल आणि अदिती तटकरे यांची राजकारणातील एन्ट्री.

Photo Credit; Social Media

Arrow

या नाराजीमुळे अवधूत तटकरे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीची साथ सोडून तत्कालिन शिवसेनेत प्रवेश केला.

Tina Ambani यांची ED चौकशी, नेमकं प्रकरण काय? समजून घ्या...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा