ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी  यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून निरुपण करण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ओळखलं जातं

श्री सदस्यांवर आलेल्या प्रत्येक प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभं करणं, तसंच त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे धर्माधिकारी कुटुंबियांचं मूळ कार्य.

श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग” माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३ सालापासून या कार्याची सुरुवात केली होती.

श्रीबैठकीशिवाय अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी धर्माधिकारी कुटुंबियांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या.

२०१७ मध्ये त्यांनी चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.