गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये असलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैलम नावाच्या पर्वतावर वसलेले आहे.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे.
चौथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील मालवा भागात आहे. इथे ठिकाणी नर्मदा नदी वाहते आणि टेकडीभोवती वाहणाऱ्या नदीमुळे ओमचा आकार तयार होतो.
केदारनाथ स्थित ज्योतिर्लिंग हे उत्तराखंडमधील केदार नावाच्या हिमालयाच्या शिखरावर आहे. बद्रीनाथच्या वाटेवर बाबा केदारनाथचे मंदिर आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे.
बाबा विश्वनाथांचे हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशची धार्मिक राजधानी मानल्या जाणाऱ्या वाराणसी शहरात आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. या ज्योतिर्लिंगाजवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. इथून गोदावरी नदीचा उगम होते
बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमधील बडोदा प्रदेशात गोमती द्वारकेजवळ आहे.
भगवान शिवाचे हे अकरावे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामनाथम या ठिकाणी वसलेले आहे.
तर बारावे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या स्थानाला शिवालय असंही म्हणतात.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
घरात 'या' 3 ठिकाणी कधीही लावू नका आरसा, नाहीतर तुमचा गुलिगत कार्यक्रमच!
धनत्रयोदशीला घरात चुकूनही आणू नका 'या' 6 गोष्टी! कंगालच व्हाल
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
घरात लावू नका ही झाडे.. वास्तूशास्त्रात काय दिलाय इशारा?