धनत्रयोदशीच्या रात्री कलश फक्त 'या' दिशेला ठेवा, आणि तुमची श्रीमंती बघा
दरवर्षी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला रोजी असणार आहे.
या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे हे देखील खूप शुभ मानले जाते.
घराच्या उत्तर दिशेचे स्वामी हे भगवान कुबेर, धन्वंतरी आणि माता लक्ष्मी आहेत. धनत्रयोदशीदिवशी या दिशेने शास्त्रानुसार उपाय केले तर तुमच्या घरातील पैसा हा कधीच कमी होणार नाही.
वास्तुनुसार धनत्रयोदशीच्या रात्री तुमची तिजोरी, रोख रक्कम, दागिने किंवा महागड्या वस्तू उत्तर दिशेला ठेवा. त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होते.
लक्ष्मी 11 धनाची देवी लक्ष्मी ही दक्षिणेकडून प्रवास करून उत्तरेला वास करते अशी एक श्रद्धा आहे.
त्यामुळे या नियमानुसार तिजोरी उत्तर दिशेला ठेवताना लक्षात ठेवावे की, तिजोरीचा दरवाजा दक्षिण बाजूला उघडू नये
धनत्रयोदशीला जर तुम्हाला रोख रक्कम, दागिने किंवा कोणतीही महागडी वस्तू उत्तर दिशेला ठेवायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही विशेष उपाय करू शकता.
धनत्रयोदशीला पितळी कलशात धणे टाका आणि त्यामध्ये एक नाणे ठेवा. नंतर त्यावर स्वस्तिक बनवा आणि त्याची एका उत्तम दिशेला स्थापना करा.