तुमचासुद्धा जन्म 'या' दिवशी झालाय? मग काही खास बाबी जाणून घ्या
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म मंगळवारी झाला आहे, त्या लोकांमध्ये काही खास गोष्टी असतात. कारण हा दिवस मंगळ (Mars) ग्रहाच्या प्रभावाखाली असतो.
Photo Credit; instagram
मंगळ ग्रहाला ऊर्जा, शौर्य आणि नेतृत्वाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी जन्मलेल्या लोकांमध्ये काही खास गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. अशा लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे असे लोक धाडसी असतात आणि ते प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करतात. असे लोक नेहमी जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात.
Photo Credit; instagram
असे लोक स्वतंत्रपणे आपला निर्णय घेतात. त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहणं आवडत नाही.
Photo Credit; instagram
मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींमध्ये जन्मत:च नेतृत्वगुण असतात. असे लोक आपल्या टीमला योग्य दिशेवर नेण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी सक्षम असतात.
Photo Credit; instagram
या दिवशी जन्मलेले लोक हाती घेतलेलं काम अगदी मेहनतीने आणि मन लावून पूर्ण करतात. कामाप्रती त्यांचं समर्पण त्यांना यश मिळवून देतं.
Photo Credit; instagram
असे व्यक्ती नाते संबंधांमध्ये प्रामाणिक असतात. ते कुटुंबातील सदस्यांचं आणि मित्रांचं नातं अगदी विश्वासाने आणि प्रामाणिकपणे जपतात.
Photo Credit; instagram
मंगळवारी जन्मलेले लोक कला, खेळ किंवा इतर कोणत्याही त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात छाप सोडतात. विशेषत: त्यांना फिजिकल अॅक्टिव्हिटीज मध्ये आवड असते.
Photo Credit; instagram
हे लोक शारीरिदृष्ट्या निरोगी आणि स्वस्थ असतात. ते आपल्या आरोग्याकडे सुद्धा तितकंच लक्ष देतात. मात्र त्यांना विशेषत: रक्ताशी संबंधित समस्या ओढवू शकतात.